मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अनेक नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. यामुळे फडणवीस आणखी आक्रमक झाले आहेत. आज यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस म्हणाले की, उद्या मी स्वतः चौकशीसाठी बीकेसी येथील सायबर पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहे. पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईन, असे त्यांनी स्पष्ट केले. यानिमित्ताने भाजपकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रविवारचा दिवस मुंबईत तणावाचा राहण्याची शक्यता आहे.
बघा, फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1502547825405485062?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw