मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई सायबर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तब्बल दोन तास चौकशी केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांनी फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना विविध प्रश्न विचारुन त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. या चौकशीवरुन फडणवीस आणखी संतप्त झाले आहेत. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. काहीही झाले तरी आता शांत बसणार नाही. एखाद्या आरोपी प्रमाणे माझ्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते मी सीबीआयला देणार आहे, असा इशाराही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1502937399378075653?s=20&t=1wCJVLVOwCyMMnlHjHT0vw