मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणातही त्यांना अटक झालीच पाहिजे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्याला वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि त्यांचे नेते प्रयत्न करीत आहेत. मुंबईचा खुन करणाऱ्याशी व्यवहार खपवून घेणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांवर अतिशय गंभीर आरोप केले. बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1498922331590123522?s=20&t=1tOfX5-OJ2OK5I_2ZPz-1w