मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. भाजपने चार राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर आणि खासकरुन फडणवीस यांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये यश खेचून आणले. यानिमित्त आज येथील भाजप कार्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला. देशभरात भाजपची अजूनही लाट आहे. भाजपच्या विकास ध्येयाला जनता मत देत आहे. आता भाजपचे पुढचे लक्ष्य हे मुंबई महापालिका आहे. आजपासूनच आम्ही मैदानात उतरलो आहोत. खरी लढाई ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतच होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनेची लढाई ही आमच्याशी नाही तर नोटाशी आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. बघा फडणवीस यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1502145419161206786?s=20&t=TSG9qtWjmz6iSpKeez-VMQ