मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेल्या सभेनंतर भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ठाकरे यांच्या सभेचा उल्लेख फडणवीस यांनी टोमणे सभा असा केला आहे. फडणवीस यांनी दोन ट्विट करुन त्यांची प्रतिक्रीया दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही,
पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही,
त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…!
माझे पुन्हा सवाल आहेत,
शेतकर्यांना मदत केव्हा करणार?
पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?
#टोमणेसभा
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1534568233214541824?s=20&t=s9JT_sCg29ntW123h5ro_g
दुसऱ्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे की,
असो,
संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना… काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती.
पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे !
#टोमणेसभा