मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर शस्त्रांनी भरलेली एका संशयास्पद बोट सापडली आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात माहिती दिली आहे. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित झाल्याने गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांना सभागृहाला उत्तर द्यावे लागले.
फडणवीस म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासात या बोटीचा कोणताही दहशतवादी अँगल समोर आलेला नाही. लेडी हान असे या बोटीचे नाव असून तिची मालक एक ऑस्ट्रेलियातील महिला आहे. या बोटीचा कॅप्टन हा महिलेचा नवरा आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती आणि याचदरम्यान तिचे इंजिन बिघडले. अशा स्थितीत बोटीवरील लोकांनी आपत्कालीन कॉल केला आणि कोरियन जहाजाने या लोकांना वाचवले, असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, बोट हळू हळू येऊन किनाऱ्यावर आदळली. भरती-ओहोटीमुळे ही बोट त्यावेळी बाहेर काढता आली नाही. अद्याप कोणताही दहशतवादी अँगल सापडलेला नाही, परंतु सणांचा हंगाम सुरू आहे आणि आम्ही सर्वांना सतर्क केले आहे. बोटीबाबत ठोस माहिती मिळाली आहे. भरती-ओहोटीमुळे ही बोट ओमानहून वाहून गेल्याने येथे आली. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. आतापर्यंत कोणताही दहशतवादी हल्ल्याचा संशय समोर आला नसला तरी आम्ही सर्व प्रकारे तपास करत आहोत. कोणतीही गोष्ट पूर्णपणे नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी सभागृहाला दिलेल्या माहितीचा व्हिडिओ असा
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1560211295429095424?s=20&t=CZ6ycGkp7TB1mp_AWgddtQ
Devendra Fadanvis on Suspected Boat Found
Raigad DYCM Monsoon Session