मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ही कारवाई राजकीय सूडापोटी करीत असल्याचा आरोप राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांनी केला आहे. या टीकेचा खरपूस समाचार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हमाले की, काही जण नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही लोकं बोलतात. मराठी माणसाच्या नावावर राज्य करायचे आणि मराठी माणसांनाच लुटायचे हे अजिबात चालणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न काही लोकं करतात…
लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही लोक बोलत असतात…
मराठी माणसाच्या नावावर राज्य करायचे आणि मराठी माणसांनाच लुटायचे, हे आता चालणार नाही.
कायदेशीर उत्तर देण्याऐवजी भावनात्मक उत्तरं देत बसण्यात अर्थ नसतो…
मुंबईत माध्यमांशी संवाद… pic.twitter.com/CBKCUw4mlN— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 6, 2022