मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे. राठोड हे प्रचंड वादग्रस्त ठरले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये राठोड हे मंत्री होते. मात्र, पुजा चव्हाण या महिलेच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आला. याप्रकरणी तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली होती. विधीमंडळातही त्यांनी हा प्रश्न गाजवला होता. विशेष म्हणजे, फडणवीस हे सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असून त्यांच्याच मंत्रिमंडळात आता राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. याचसंदर्भात आता काँग्रेसने फडणवीस यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे, बघा, या व्हिडिओमध्ये फडणवीस हे संजय राठोड यांच्याविषयी काय बोलत आहेत….
https://twitter.com/INCMaharashtra/status/1556928947182800896?s=20&t=tgIiCYfkMoMD5IzpLi06Xg
Devendra Fadanvis on Sanjay Rathod Video
Maharashtra Politics Controversy Cabinet Expansion New Cabinet