मुंबई – राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळेच भरती परीक्षा घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यात १५ ते ३० लाखांची डील झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज सुरू झाले. अधिवेशन सुरू होताच फडणवीस यांनी परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नावर तातडीने चर्चा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. एकेका पदासाठी किती बोली लागली याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आरोग्य, म्हाडा, टीईटी अशा अनेक परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचे फडणवीस म्हणाले. बघा, त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1473572679009521665?s=20