नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भाजपमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात कायद्याचे सरकार नाही. ही तर हुकुमशाही आहे. कुणाच्याही घरावर आंदोलन करण्यास भाजप पाठिंबा देत नाही. मात्र, राणा दाम्पत्य हे केवळ हनुमान चालिसाचे पठण करणार होते. त्यामुळे त्याला विरोध करण्याची काहीच गरज नाही. राज्य सरकारच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत ते काय म्हणाले बघा याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1517901880453570560?s=20&t=-rQWq_mCfCVXk7nJtQigOg