नागपूर – सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागासवर्गीय आरक्षण (ओबीसी) रद्द केले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणावरुन होणार नाहीत, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज येथए माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार हे नाकर्ते आहे. ओबीसी आऱक्षणासाठी पैशाची नाही तर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती या सरकारकडे नाही. ओबीसी समाजावर मोठा अन्याय होत आहे. राज्य सरकारने याची नैतिक जबाबदारी स्विकारावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस आणखी काय म्हणाले बघा त्याचा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1471051244705701890?s=20