मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन विधीमंडळाच्या अधिवेशनात पुन्हा गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारला या प्रश्नी घेरले तर सत्ताधाऱ्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले. मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुनही आज जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे कालप्रमाणे आजचा दिवसही विधीमंडळात रणकंदनाचाच आहे. ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेश सरकारप्रमाणे कायद्यात बदल करायला हवा. राज्य सरकारने ती तयारी करावी. आम्ही त्यास पाठिंबा देऊ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. बघा ते माध्यमांशी संवाद साधताना काय म्हणाले
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1499625987318771712?s=20&t=ajWsEwPFqndNyJRuwo7ZjQ