मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेते किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असतानाही त्यांच्या गाडीवर काल रात्री हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, सोमय्या यांनी खार पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची पूर्वसूचना मुंबई पोलिसांना दिली होती. तरीही अशा प्रकारचा हल्ला होणे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याप्रकरणावरुन ते अतिशय संतप्त झाले आहेत. हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही मग काय पाकिस्तानात म्हणायचा आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.
फडणवीस यांनी माध्यमांशी साधलेला संवाद असा
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1518155067483774976?s=20&t=MoDtXMqFLAN5vuprs-S3ZQ