नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चांगलेच अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या संकटातही महाविकास आघाडीवर जोरदार टीका करणारे आणि सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या फडणवीस यांना त्यांच्या पुतण्यानेच अडचणीत आणले आहे. फडणवीस यांचा पतण्या तन्मय फडणवीस याने येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये कोरोना लस घेतल्यानंतर त्याचा फोटो सोशल मिडियात शेअर केला.
विशेष म्हणजे, तन्मय याचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नसताना त्याने लस कशी घेतली, असा प्रश्न सोशल मिडियातून विचारला जाऊ लागला. हे प्रकरण चांगलेच तापल्याने अखेर तन्मय याने सोशल मिडिया अकाऊंटवरील तो फोटो डिलीट केला. मात्र, यासंदर्भात फडणवीस यांच्यावर सध्या प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का, तुमचा पुतण्या आहे म्हणून लस दिली का, १ मे नंतर लस घेतली असती तर काही बिघडले असते का अशा प्रश्न आणि पोस्टचा तुफान मारा यानिमित्ताने होत आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार याप्रकरणी तन्मयवर काय कारवाई करणार आणि केली तर त्याच्या बचावासाठी फडणवीस पोलिस स्टेशनमध्ये जाणार का, अशा बहुविध प्रकारच्या पोस्टनी सध्या सोशल मिडिया गाजत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अशी उडवली खिल्ली
https://twitter.com/NCPspeaks/status/1384471546681466883