मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घाणाघाती सभेतील टीकेवर पलटवार करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज उत्तर सभा होत आहे. गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. त्यामुळे ते या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी फडणवीस यांच्यासह भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी फडणवीस यांची सभा आज होत आहे. लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होमार आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपने मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी फडणवीस यांची एक सभा झाली आहे. आता ही दुसरी सभा होत आहे. यानिमित्ताने मुंबई पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरतानाच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्याअंतर्गतच फडणवीस आज काय बोलणार, महापालिकेचे कोणते प्रकरण बाहेर काढणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1525509543048151041?s=20&t=fOH4sgy3BUtAghhsiIE4Uw