मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी केल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज विधिमंडळात चांगलेच कडाडले. ते म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून मला प्रश्नावली प्राप्त झाली. त्यास मी लेखी कळविले होते की मी उत्तर देणार आहे. मात्र, नंतर मला नोटिस पाठविण्यात आली. आधी जे प्रश्न विचारले होते ते साक्षीदारासाठीचे होते. पण, कालचे प्रश्न हे आरोपी करता येते का, या हेतून होते. ते कुणी बदलले हे सुद्धा मला माहित असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.तसेच या प्रश्नावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी चांगलेच धारेवर धरले. फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ असा
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1503289960769548290?s=20&t=tnIISZ-bfCrOqx-_BBnVnQ