मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या शपथविधी सोहळ्यातील एक महत्त्वाची बाब काँग्रेसने समोर आणली आहे. ती म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन भाजपचे मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार करीत आहेत. भाजपच्या नादी लागून स्वतःची काय गत करुन घेतली शिंदे साहेब असा खोचक सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे. शिंदे यांचे सरकारमधील स्थान काय हे न बोललेलंच बरं, असा टोलाही काँग्रेसने हाणला आहे. यासंदर्भात काँग्रेसने शपथविधी सोहळ्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यातून हे सर्व स्पष्ट केले जात आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/INCMaharashtra/status/1557010982580490240?s=20&t=kl9c2QV9hxtWn-emQaQMiQ
Devendra Fadanvis Eknath Shinde Swearing Ceremony Video