मुंबई – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपने एक अभियान सुरू केले आहे. सूक्ष्म दान नावाचे हे अभियान म्हणजे पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी आहे. यात पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांसह अन्य व्यक्तीही पैसे जमा करु शकतात. राज्य विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्ष निधी दिला आहे. त्यांनी किती पैसे पक्षाला दिले असतील, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. यासंदर्भात फडणवीस यांनीच ट्विट करुन पक्ष निधीची माहिती सर्वांना दिली आहे. त्यानुसार, फडणवीस यांनी पक्षाला १ हजार रुपयांचा निधी दिला आहे. बघा, त्यांचे हे ट्विट
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1474695922839740418?s=20