नाशिक – टीका करणारे टीका करतात, काम करणारे काम करतात, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. पण, हा निर्णय सर्वांना पटवून देण्यात यश आले नाही, हे पंतप्रधानांनीचं म्हटलंय निर्णय मागे घेण्याचा लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा मोदींना दाखवला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायदा रद्द करण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नाशिकमध्ये दिली.
ते भाजपच्या आ. देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जे टीका करतात, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. टीकाकारांना जनताच उत्तर देईल. टिकाकरांची भूमिका दुटप्पी असल्याचे ते म्हणाले. यावेळी एसटी संपाबाबत बोलतांना ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय, निर्णय राज्यसरकारला घ्यायचा असे सांगत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सामानाच्या अग्रलेखावर बोलतांना सांगितले की, आजच्या सामनातील लेखावरून त्यांचा अहंकार झळकतोय. लेख लिहणारेच अहंकारी आहे.
https://www.facebook.com/239595939526679/posts/2235119563307630/