पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळले. त्यामुळे ही बाब वारकऱ्यांमध्येही उत्साह निर्माण करणारी ठरली.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांसोबत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरून रंगत आणली. ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष सुरू असताना श्री. फडणवीस यांनी गळ्यात टाळ अडकवून वारकऱ्यांना साथ दिली. तर श्रीमती फडणवीस यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात फेर धरला.
…अन दोघांनीही घेतला फुगडीचा आनंद
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांना फुगडी खेळण्याचाही मोह आवरला नाही. दोघांनीही बाल वारकऱ्यांसह इतर वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून कार्तिकी वारीचा आनंद साजरा केला. यावेळी आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1588263340425760768?s=20&t=_iJE3v2SsysTJzGxulUUnQ
Devendra and Amruta Fadanvis Fugdi Video
Pandharpur