देवळाली कॅम्प – येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली डायलेसिस सुविधा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू करण्यात आल्याने गरजू रुग्णांकरता अत्यल्प दरात ती उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन उद्घाटक डॉ सुबोध पंडित यांनी केले.
येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या शेजारी डॉ.बी.जी.पंडित यांच्या नावे असलेल्या वास्तूत या डायलेसिस युनिटचे लोकार्पण झाले. याप्रसंगी डॉ. सुबोध पंडित बोलत होते. यावेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए राजेश यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. आशा पंडित, नियुक्त सदस्य प्रीतम आढाव, माजी नगरसेवक बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, भगवान कटारिया कावेरी, कासार प्रभावती धिवरे, आशा गोडसे, भीमराव धिवरे,चंद्रकांत गोडसे, क्वालिटी किडनी केअरचे संचालक अजित मिश्रा, राकेश मित्तल, हेमंत वजीरानी, अनिता वागळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राहुल गजभिये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्ताविकातून डॉ. नागेश अघोर यांनी या डायलेसिस सुविधेविषयी माहिती दिली.यावेळी ब्रिगेडियर ए.रागेश, भगवान कटारिया यांची समयोचित भाषणे झाली. या डायलेसिस युनिटच्या माध्यमातून देवळालीसह ग्रामीण भागातील रुग्णांना केवळ ९०० रु. आकारणी करून ३ डायलेसिस युनिटच्या माध्यमातून ही सुविधा कॅन्टोनेन्ट प्रशासनाने उपलब्ध केली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोविड प्रादुर्भावामुळे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल हे संपूर्णपणे कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्याने हे युनिट तयार असून देखील रुग्णांवर उपचार करण्यासाठी खुले करण्यात येत नव्हते. याशिवाय अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी हे युनिट सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. काल प्रशासनाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे युनिट नागरिकांसाठी बीओटी तत्त्वावर सुरू केले आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री नटेश यांनी स्वागत तर डॉ.शाहू पाटील यांनी सूत्रसंचालन तर आभार सीईओ डॉ राहुल गजभिये यांनी मानले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर, लेखापाल विवेक बंड, अभियंता स्वप्नील क्षोत्रिय, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, प्रभाकर दोंदे, सत्येंद्र तेजाळे, वसंत शेरमाळे, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे आदींसह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.