ज्ञान,भक्ती आणि धर्माच्या संस्कासाठी गुरुपरंपरा
– द्वाराचार्य डॉ.रामकृष्णदास महाराज लहवितकर
देवळाली कॅम्प – मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या उद्धारासाठी गुरूची गरज असते आणि याच कारणाने भारतवर्षात ज्ञान,भक्ती आणि धर्म संस्कारासाठी गुरुपरंपरा निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन जगदगुरू द्वाराचार्य डॉ.रामकृष्णदासदेवाचार्य लहवितकर यांनी केले. श्री क्षेत्र लहवित येथील वाडीचा मळा येथे स्थापन करण्यात आलेल्या भारतातील ५८ द्वारांपैकी एक असलेल्या जगतगुरु विठ्ठलनाथ द्वारा धर्मपीठामध्ये सकाळी जगदगुरू द्वाराचार्य डॉ.रामकृष्णदासदेवाचार्य लहवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तधातूच्या विठ्ठल-रुख्मिणी मातेच्या मुर्तीसह पादुकांचे वेदऋचांच्या मंत्रघोषात विधिवत पूजन करण्यात केले. त्यानंतर वारकरी सांप्रदायात महत्व असलेल्या गुरुपरंपरेतील जगतगुरु विठ्ठलनाथ द्वारा चरण पादुका महापूजन समस्त विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडले. दिवसभर भाविक संत कुटिया येथे दर्शनासाठी येत होते. दुपारी गायनाचार्य हभप रोहिदास महाराज मते, हभप विकास बेलूकर, हभप भूषण जाधव, हभप निलेश गाढवे, हभप अवधूत आहेर,हभप तुकाराम शिंदे, हभप कृष्णा मुठाळ, हभप राहुल गायकवाड व हभप प्रतीक गायकवाड आदींचा संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्ही.जी.काळे,विठ्ठल ढेंरिंगे, शंकर मुठाळ,शंकर गायकवाड,गजीराम मुठाळ,विष्णू काळे, मुकुंद पाळदे नामदेव ढेंरिंगे आदी उपस्थित होते.
विश्व मानव रुहानी मिशन
भगूर-लहवित रोडवरील विश्व मानव रुहानी मिशनच्या वतीने परमसंत ठाकरसिंग महाराज,परमसंत कृपालसिंह महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व गुरुवंदना पार पडली. याप्रसंगी संतोष भवर, खंडू जगताप, मनोज पाटील,सागर जाधव, चंद्रकांत देशमुख,दिनेश अहिरे, राकेश दंडगव्हाळ,राजेंद्र कदम आदी सेवक उपस्थित होते. कोव्हीड महामारीमुळे आश्रम बंद असल्याने बाहेरूनच भाविकांनी दर्शन घेतले. साई मंदिरात महापूजा
वडनेर रोड येथे किरण स्मृती साई बाबा मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त कमल देवाडिगा,माला देवाडिगा यांच्या हस्ते महापूजा तर शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली.यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, बाळासाहेब गोडसे, पोपट जाधव, चंद्रकांत गोडसे, सतीश मेवानी,माया दिदी लुल्ला आदी उपस्थित होते.