नाशिक :देवळाली कॅम्प येथील झेंडा चौकात खाद्यपदार्थाच्या गाड्यावर उभ्या असलेल्या तरूणास तीन जणांच्या टोळक्याने विनाकारण बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत जखमी तरूण रूग्णालयात पोहचला असता त्यास तेथेही टोळक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतांना अटक केली आहे. प्रेम किशोर परदेशी,सिध्दार्थ किशोर परदेशी (दोघा रा.आनंदरोड) व सागर सुनिल मोरे (रा.सिध्दार्थ नगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी रणजीतसिंग कुवलंतसिंग देव (२९ रा.देवी मंदिरामागे,दे.कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. रणजितसिंग सोमवारी (दि.७) रात्री झेंडा चौकातील एका खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यावर जेवणासाठी गेला असता ही घटना घडली. चायनीज गाडीवर उभे असतांना त्रिकुटाने त्यास गाठले. यावेळी कुठलेही कारण नसतांना संशयीतांनी जवळ बोलावून घेत शिवीगाळ केली. एकाने चापट मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने रणजितसिंग यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एकाने गाड्यावरील लोंखडी उचटणी उचलून डोक्यात मारली तर एकाने फरचीचा तुकडा फेकुन मारल्याने ते जखमी झाले. मित्र फर्नांडीस यांनी त्यास कॅन्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असता टोळक्याने पुन्हा गाठून रूग्णालयातच रणजितसिंग यास मारहाण केली. पोलीसांनी संशयीतांना अटक केली असून अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.