देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील निवाणेबारी परिसरात बिबट्याची कातडी विकण्या-याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कातडी विकण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर परिसरात पोलिस पथकाचा सापळा रचत राजू वाळू जगताप या कळवणच्या आठंबे येथील व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बिबट्याची कातडी जप्त केली आहे. या संशयिताच्या विरोधात देवळा पोलिसात वन्यजीव संरक्षण कायद्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे आणखी कोणी तस्करी करणारे आहेत का याचा पोलिस शोध घेत आहे.