सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या वसंत दादा सहकारी कारखान्यावर आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला असून हा कारखाना पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजीत पाटील यांनी भाडे तत्वावर घेतला आहे.
सकाळी ७ वाजता अधिकाऱ्यांची टीम या कारखाना स्थळावर पोहचला ५ तासा पेक्षा जास्त वेळ होऊन गेली असली तरी कोणालाही आत जाण्यास परवानगी नाही. त्यातच तेथे नेमके काय होतेय याची माहिती गुप्त ठेवण्यात आलेली असल्याने अधिकृत माहिती अद्याप पर्यंत मिळू शकलेली नाही. राज्यात अभिजीत पाटील यांच्या असलेल्या इतर कारखान्यावरही छापा टाकण्यात आला आहे.