देवळा : प्रत्येकाची भुमिका आरक्षण मिळावी हीच असेल तर यासाठी झेंड्याची गरज नाही, मराठा आरक्षण प्रश्नावर सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. देवळा येथे मराठा आरक्षण संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
देवळा येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात देवळा तालुका भाजपाने बैठकीचे आयोजन केले होते. भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जिल्हा सरचिटणीस सुनिल बच्छाव, कळवण तालुकाध्यक्ष दिपक खैरणार, देवळा शहराध्यक्ष अतुल पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. देवळा व कळवण तालुका भाजपा, व देवळा नगरपंचायतीच्या वतीने बाळकृष्ण विखे पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
मंत्रीमंडळात एकवाक्यता नाही, त्याचा फटका मराठा आरक्षणाला बसला असून ह्या प्रश्नावर सर्व संघटनांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, यापूर्वी स्वयंस्फुर्तीने झालेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली व त्याचा मराठा समाजाला फायदा झाल्याची बाब विखे पाटील यांनी निदर्शनास आणून देत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. मराठा समाजाच्या व्यथा यावेळी मांडण्यात आल्या. अंतर्गत वादविवादामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित नको, आरक्षणाविषयी मराठा समाजात संभ्रम असून भावना तिव्र आहेत, न्यायालयात टिकेल असे आरक्षण मिळवून द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजू पगार, शाहू शिरसाठ, दिपक जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त करतांना केली. दिपक खैरणार यांनी आभार मानले. यावेळी गटनेते जितेंद्र आहेर, अशोक आहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत आहेर, माजी सरपंच भाऊसाहेब पगार, संभाजी आहेर, डॉ. कोलम निकम, आण्णा पाटील, किशोर आहेर, पुंडलिक आहेर, शाहू शिरसाठ, केदा शिरसाठ, दीपक जाधव, राजेंद्र पवार, डॉ प्रशांत निकम, मुन्ना आहेर, डॉ. राजेंद्र गुंजाळ, शंकर निकम, प्रदीप आहेर, नानु आहेर, हर्षद भामरे, बाळासाहेब आहेर, दिलीप आहेर तसेच देवळा, कळवण, सुरगाणा तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते.