देवळा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पिंपळगाव (वा.) येथील ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला लोकवर्गणीतून ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन व सिलेंडर भेट देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं होते. या काळात ऑक्सिजन वेळेत मिळाला नाही म्हणून अनेक रुग्णांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला. लॉकडाऊनमुळे दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या काळात देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो, हा भविष्यातील धोका लक्षात घेता, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन, ऑक्सिजन सिलेंडर आदी साहित्य उपकेंद्रातील परिचारिका शोभा पगार यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक ग्यानदेव वाघ, डॉ. संतोष सोनार, डॉ. धनंजय थोरात, डॉ. भास्कर शिरुडे, माजी उपसरपंच नदीश थोरात, श्रावण थोरात, यशवंत खैरनार, भूपालकुमार अहिरे, पप्पू वाघ, प्रशांत पाटील, रवींद्र कदम, दत्तू साबळे, बाळा थोरात, दिनेश खैरनार, योगेश सोनजे, भिला खैरनार, अशोक कदम ,दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
युवकांचा संकल्प