देवळा : खर्डे येथील एका वृद्ध इसमाने राहत्या घराजवळ स्वतःला पेटवून घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने एकच खळबळ उडाली असून, देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , खर्डे ता. देवळा येथील प्रगतिशील शेतकरी बाबुराव शंकर गांगुर्डे (वय ८०वर्षे ) हे पत्नीसह वास्तव्यास होते. मंगळवारी (दि. २) रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळ बाबुराव गांगुर्डे यांनी स्वतःला पेटवून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली . सदरची घटना गल्लीत राहणाऱ्या नागरिकांनी पहाताच हळहळ व्यक्त करण्यात आली. घराजवळ गर्दी जमा झाल्याने त्यांच्या वृद्ध पत्नी राधाबाई यांना स्मृतिभ्रंशाचा आजार असून पतीने जाळून घेतल्याची त्यांना कल्पना नव्हती या घटनेची खबर पोलीस पाटील भरत जगताप यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ देवळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. बिट हवालदार एस .ए. पवार नितींन साळवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याच्या परिस्थितीत नसल्याने वैद्यकीय अधिका-यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या त्याबात दिला. मृत गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचे नेमके कारण समजू शकेल नसून, अतिशय मितभाषी असलेल्या या इसमाच्या अकस्मात मृत्यूने खर्डे व परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.ए. पवार,नितीन सावळे करीत आहेत.