देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळा येथे पोलिसांनी सापळा रचून हॉटेल वेलकम या ठिकाणी चालु असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करुन हॉटेल मालक व मॅनेजर यांचेवर देवळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
देवळा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव रोडजवळील हॉटेल वेलकम या ठिकाणी हॉटेल मालक सुनिल परशराम आहेर उर्फ गोदु आवा व त्यांचे मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे दोन्ही रा. देवळा हे सदर हॉटेलवर गरजु महिलांना पैशाचे आमीष दाखवून अर्थिक फायद्यासाठी बळजबरीने वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा सापळा रचण्यात आला. पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, पोउपनिरि दामोदर काळे, ग्रेडपोउपनिरि विनय देवरे, पोहवा इंद्रजित बर्ड, पोहवा. नितिन बाराहाते, पोलीस अंमलदार श्रावन शिंदे, संदिप चौधरी, महिला पोलीस अंमलदार माधुरी पवार, स्वाती चव्हाण व अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील सपोनि पुष्या आरणे, पोलीस अंमलदार योगेश तनपुरे, ऋषिकेश सपकाळे, मनोहर मोहारे, सुनिल गांगोडे. सुनिल जगताप पो.हवा. आश्विन धोत्रे सर्व नेम अपर पोलीस अधिक्षक कार्यालय यांनी सर्वांनी सापळा रचुन पंटरच्या मदतीने हॉटेल वेलकमवर शनिवारी रात्री १०.३५ वाजेच्या सुमारास छापा टाकला.
या छाप्यात हॉटेलचे मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे यांना ताब्यात घेऊन तसेच पंटरचे मदतीने खात्री केली असता वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या महिला वरील मजल्यावर असलेबाबत खात्रीलायक माहीती मिळाल्याने पथकातील महिला अंमलदार यांचे मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. सदर ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य साधने तसेच रोख रुपये व सोन्याचांदीचे दागीने तसेच मोबाईल फोन मिळून आले.
यानंतर डांबून ठेवलेल्या महिलांकडे सुटका केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आम्हाला वेश्याव्यवसायासाठी हॉटेल मालक सुनिल परशराम आहेर उर्फ गोटु आबा व त्यांचे मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे दोन्ही रा.देवळा यांनी बोलावुन घेवुन सदर ठिकाणी पैसे देण्याचे बदल्यात डांबुन ठेवले. त्यानंतर या महिलांची सुटका करुन हॉटेल मालक सुनिल परशराम आहेर उर्फ गोटु आबा मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे दोन्ही रा. देवळा यांचेविरुद्ध पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे फिर्यादीवरुन देवळा पोलीस ठाणेस अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3.4.5.6 व भारतिय न्यायसंहिता 2023 च्या कलम 143 (1), 143(2), 143 (3) अन्वये देवळा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर २४ फेब्रुवारी पर्यंत दोघांना पोलीस कस्टडी देण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास देवळा पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते हे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील पीडित महिला या बांग्लादेशी असल्याचा संशय असून त्यादृष्टीने सखोल तपास सुरु आहे.