देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सलून व्यावसायिक तुषार काशीनाथ हिरे हा तरुण गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाला होता. आज दुपारच्या समुरास त्याचा मृतदेह कोलथी नदीवरील केटी वेअर बंधा-यात आढळून आला. बेपत्ता झालेल्याने कुटूंबाने देवळा पोलिसात तक्रार दाखल केलेली होती. अनेक ठिकाणी संपर्क करुनही त्याचा शोध लागत नव्हता. अखेर आज केटी वेअर मध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविला असून पोलिस याचा अधिक तपास करीत आहे.