देवळा : शहरासह ग्रामीण भागातील फेसबुक अकाऊंट हॅक करून संबंधितांच्या मित्रांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उजेडात आला असून सर्व फेसबुकधारकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे .
देवळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांच्या मित्रांकडून पैसे मागणीचा प्रकार घडला होता. त्यात अनेकांना आर्थिक फटका बसल्याने त्यांनी वेळीच खबरदारी घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसाच प्रकार खाल येथील ठेकेदार व पत्रकार दिनेश सोनार यांच्या बाबतीत घडला असून त्यांचे फेसबुक अकाऊंट खाते हॅकर्सने हॅक करून त्या फेसबुक अकाउंट वरील मेसेंजरवर संदेश पाठवुन अनेकांकडे पैशाची मागणी केली. त्यात दिनेश सोनार यांना माहीती झाल्या नुसार त्यांचे मित्र सचिन काशिनाथ धामणे यांचे कडून फोन पे मार्फत कमलेश या नावाने व या नंबर ९४६०९७३१६९ वर रक्कम रुपये १५००० (पंधरा हजार रुपये) तसेच चेतन संतोष सुर्यवंशी यांचे कडून रक्कम ७००० (सात हजार) घेतले आहे. तसेच अनेक मित्रांना त्याने खाते नंबर ९१८२२२२८२९७५० IFC PYTM0१२३४५६ वर पैशाची मागणी केलेली आहे. त्यामुळे अनेक मित्रांनी पैसे पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ९६७८६०५०३४ या नंबर वरून व्हॉटआप वरून सुद्धा पैसे मागण्यात आले आहेत.त्यामुळे दिनेश सोनार यांनी तात्काळ देवळा पोलिसात तक्रार दाखल करून संबंधित हॅकर्सचा शोध घेण्याची मागणी केली आहे.