अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील वासोळ येथील बुडकी मंगेवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन घडले. एका नागरिकांने बिबट्याचा मुक्त संचार असतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे वासोळसह परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने तात्काळ दखल घेऊन ड्रोन कॅमेरा द्वारे लक्ष देवून पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याच परिसरात आठ दिवस अगोदर बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला होता. मात्र वनविभागाने त्या घटनेकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.








