अजय सोनवणे
देवळा – कधी शेतक-याला तर कधी ग्राहकाला हसविणा-या कांद्याचे दर सध्या १ हजार रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला असून कांद्याला अडीच ते तीन हजार रुपयाचा दर मिळावा यासाठी आज नाशिकच्या देवळा शहरात शेतकरी संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राज्यात विशेषत नाशिक जिल्हयात यंदा उन्हाळी कांद्याच विक्रमी उत्पादन झालय.त्यामुळे जिल्हयाच्या बाजार समितीत कांद्याची आवक एकीकडे वाढलेली असतांना दुसरीकडे कांद्याची हवी तशी निर्यात होत नसल्याने कांद्याचे दर ५०० ते ८०० रुपयांच्या आत येऊन पोहचल्याने शेतक-यांचा उत्पादन खर्च सुध्दा वसुल होत नाहीय.त्यामुळे नाशिकच्या देवळा येथे कांदा उत्पादक संघटना,प्रहार जनशक्ती,स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात ले.कांद्याला ५०० रुपये प्रतिक्विंटल हमी भावाने अनुदान देण्यात यावे त्याच प्रमाणे नाफेडची कांदा खरेदी निकोप,पारदर्शक,व भ्रष्ट्राचारमुक्त असावी आणि नाफेडची कांदा खरेदी उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमतीने व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलक शेतक-यांनी यावेळी केलीय.