देवळा : मी तुझ्या नावाचे आणखी बनावट अकाउंट उघडून आपले फोटो व्हायरल करेल आणि तुझी नातेवाईकांमध्ये बदनामी करेल तूझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देत युवतीला ब्लॅकमेलिंग करणा-या पुणे जिल्ह्यातील साकुरी येथील सिद्धार्थ बाळू सोनवणे याच्याविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा पोलिस स्थानकात पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, सोनवणे याने फेसबुक अकाउंट सर्च करून दोन बनावट अकांउट तयार करुन ब्लॅकमेलिंग केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी भादवी कलम ३५४(ड) ५०६ माहिती तंत्रज्ञान सन २००० च्या कलम ६६ क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज हे करत आहेत.