मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC), मुंबई कस्टम्स झोन-I आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या ड्रग डिस्ट्रक्शन कमिटीने 24.73 किलो नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) जाळून नष्ट केले आहेत. नवी मुंबई येथील तळोजा येथे मुंबई कचरा व्यवस्थापन लिमिटेडच्या सामायिक घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (CHWTSDF) केंद्र येथे हेरॉईन, कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांसह, 177 कोटी रुपये इतके अंदाजे बेकायदेशीर बाजार मूल्य असलेले पदार्थ नष्ट करण्यात आले. चालू आर्थिक वर्षातील अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई आहे.
गेल्या आर्थिक वर्षात मुंबई कस्टम झोन-1 ने 1,525 कोटी रुपये किंमतीचे 215.27 किलो ड्रग्ज नष्ट केले होते. पोस्टल मूल्यांकन विभाग (PAS) आणि मुंबई कस्टम झोन-I च्या विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (SIIB) यांनी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या सहकार्याने हे अंमली पदार्थ जप्त केले.