मुंबई – जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयासह विविध संस्था कारवाई करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींकडे या कारखान्याची मालकी असल्याने या कारवाईला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, याप्रकरणी पवार यांना टार्गेट केले जात असल्याचाही आरोप केला जात आहे. यासंदर्भात प्रथमच अजित पवार यांनी विस्तृत भाष्य केले आहे. बघा ते काय म्हणताय
जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक चौकशीचा सामना करावा लागत आहे. माध्यमांशी बोलताना याबाबत आपली भूमिका अजितदादांनी मांडली व या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी रीतसर एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. pic.twitter.com/xZYAZHCTgE
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 21, 2021