आषाढी वारी पालखी सोहळ्यातील १० मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणााले की, देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार आहे. तर उर्वरित ८ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार आहे.
पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावलीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केली होती. त्याबाबत वारकरी संप्रदायातील प्रमखांची बैठकही झाली. त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील १० मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचे श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे प्रशासक अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!