नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देवळ्याचे माजी आमदार शांताराम (तात्या) आहेर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक निस्वार्थी, एक संघर्षयोद्धा हरपला असल्याच्या शोक भावना व्यक्त होत आहे.
राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात आहेर यांनी अनेक पदे भूषवली. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. देवळा तालुक्यात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. त्यांच्या निधनाने देवळा तालुका एका मोठ्या नेतृत्वाला कायमचा मुकला आहे. मी व माझे कुटुंबीय आहेर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
Deola EX MLA Shantaram Aaher Death