डांगसौंदाणे (ता. सटाणा) – खडकतळे (देवळा) शाळेचे आदर्श मुख्याध्यापक जी. व्ही .आहेर हे आपल्या 35 वर्ष्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत इंग्रजी विषयातुन पदवी संपादन करून देवळा एज्युकेशन संस्थेत 1987 साली सेवेत रुजू झालेले जी. व्ही. आहेर यांनी डांगसौंदाणे,देवळा, कनाशी, नांदगाव आदी शाळेत इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. तर खडकतळे विद्यालयाचे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले आहे.
इंग्रजी विषयात आपल्या शब्द चातुर्याने अनेक विद्यार्थी घडविणारे शिक्षक म्हणुन श्री जी.व्ही. आहेर यांची देवळा एज्युकेशन संस्थेत ओळख आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणुन नावलौकिक असलेले जी. व्ही. आहेर यांचा विद्यार्थी वर्गात असलेला दबदबा आणि त्यांनी घडविलेले विद्यार्थी अनेक ठिकाणी उचपदस्थ अधिकारी आहेत .जी.व्ही. आहेर सरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 1998 -99 या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानुन 35 वर्ष सेवा करणारे जी.व्ही.आहेर आज सेवानिवृत्त होत असल्याने एक इंग्रजीचे विषयाचे गाढे अभ्यासक व विद्यार्थी प्रिय शिक्षकाच्या ज्ञानाला विद्यार्थी मुकणार आहेत