नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातले असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. आता काही भागात पाऊस थांबला असला तरी ठिकठिकाणी पाण्याची टक्के साचून डासांचे प्रमाण वाढले असून डेंगू व मलेरिया याचे रुग्ण वाढले आहेत. तसेच ढगाळ हवामान आणि गारठ्यामुळे थंडी, ताप सर्दी खोकला आणि यासारखे आजार पसरले आहेत.
पावसाळा सुरू होताच डेंग्यू व मलेरियासारख्या गंभीर आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर साचलेले पाणी आणि घाण हे त्याचे प्रमुख कारण आहे. पाण्यामुळे डासांची उत्पत्ती सहजतेने होते आणि ते मलेरियासारखे आजार पसरवतात. परंतु जर आपण खबरदारी घेतली तर हा आजार होण्याचा धोका आणखी कमी होतो. डेंग्यू आणि मलेरिया हे डासांमुळे पसरणारे साथीचे रोग आहेत. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा व्यक्तींना याची लागण लवकर होते.
फक्त घाण पाण्यातच नव्हे, तर स्वच्छ पाण्यातसुद्धा या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छतेला जास्त महत्त्व द्यायला हवं. तसंच या आजारांची लागण झाल्यास ताप, सर्दी, घसा दुखणे सांधेदुखी अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घ्यायला हवी. डेंग्यू आणि मलेरियाची कुठलीही लक्षणं दिसली, तर त्वरित उपचार घ्यायला हवेत. डॉक्टरांकडच्या उपचारांशिवाय काही घरगुती उपचारांचीही मदत होऊ शकते. दैनंदिन जीवनात या उपायांचा समावेश केल्यास या आजारांची लागण होण्याचा धोका कमी होईल.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदि शहरांमध्ये ही मलेरिया आणि डेग्यूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. यामुळे या रोगांपासून दूर राहण्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी.ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची संख्या झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, असे कपडे घाला जे तुमची त्वचा पूर्णपणे झाकून ठेवेल. यासाठी फुल स्लीव्ह पँट, लांब बाहींचा शर्ट घाला. चप्पल ऐवजी शूज घालण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे डास आजूबाजूला येणार नाहीत.
घरगुती उपायांमध्ये आले किंवा अद्रक वापरा, कारण आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतात. आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जर ते योग्य प्रकारे सेवन केले तर ते आपली प्रतिकारशक्ती वाढवते. जर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर मलेरिया सारख्या गंभीर आजारांपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. आल्याची पूड घेऊन ते पाण्यात मिसळून प्या. यामुळे मलेरियासारखे रोग आपल्याला होणार नाहीत.आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, आयुर्वेदातही आल्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तसेच सुंठ पावडर पाण्यात मिसळून रोज प्यायल्यास प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
पपईची पाने आणि मध याचा वापर करा. मलेरिया किंवा डेंग्यू झाल्यास प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. औषधांव्यतिरिक्त घरगुती उपचारही वापरले जातात. मलेरिया किंवा डेंग्यूमुळे आपल्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. पपईच्या पानांमध्ये असे अनेक गुणधर्म असतात, पपईच्या पानांच्या साह्याने प्लेटलेट्स वाढवणे शक्य आहे. पपईच्या पानांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे पपईची पानं पाण्यात उकळून त्यात मध मिसळून ते पेय रोज सकाळी प्यायल्यास आराम मिळेल.
मेथीदाणे हे गुणकारी असतात, कारण मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी-प्लाज्मोडियम असते, रोगप्रतिकारक शक्ती ते वाढवून मलेरियाच्या विषाणूला नष्ट करण्याचे काम करते. मेथीच्या दाण्यांची रेसिपी अवलंबण्यासाठी त्याचे दाणे रात्री भिजत ठेवावे आणि सकाळी थोडेसे गरम करून हे पाणी प्यावे. हवे असल्यास भिजवलेल्या दाण्यांची पेस्ट बनवूनही खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मेथी खूप उपयुक्त आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी-प्लाज्मोडियम असते, असे केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहील आणि डेंग्यू-मलेरियासारखे आजार दूर राहतील.
Dengue Malerai Immunity Power Health Tips Nutrition Food