मुंबई – १४ जून २०२१ रोजी ज्या तेलाच्या किंमती ब्रेन्ट आणि डब्ल्यूटीआय (सीएमपी: $७३.०७ आणि ७१.०८/बीबीएल) होत्या, त्या मागील आठवड्यात दुहेरी अंकांच्या (ब्रेन्टमध्ये ९.७% आणि डब्ल्यूटीआयमध्ये ११.५ टक्के) लाभ सह उच्च स्तरवार कारभार करत आहेत, जे १४ जून २०२१ ते २१ मे २०२१ च्या आलेखात येथे दाखवले आहे. एमसीएक्स फ्यूचर्सवर याच कालावधीत तेलाच्या किंमतीत ११.५ टक्के तेजी आली.
एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले की इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे जागतिक मागणी महामारीच्या आधीच्या पातळीवर जाण्याचे अनुमान, अमेरिकेत लॉकडाउनमध्ये दिलेल्या सूट मुळे अधिक वाहनांची वाहतूक आणि विमान वाहतूक वाढल्याने तेलाच्या मागणीतील वाढ, उत्तर कॅनडा आणि उत्तर समुद्रात मेंटेनन्सचा मोसम, तेल बाजारात संतुलनासाठी ओपेकचा कम्प्लायन्स, यूएसबरोबर तेहरान अणू करारात सामील झाल्यावर बोलणी रेंगाळल्यामुळे ईराणमधून लवकरच बाजारात अतिरिक्त पुरवठा येण्याची शक्यता धूसर झाल्याने तेलाच्या किंमतीत आशावाद वाढला आहे.
तेलाची मागणी वाढणार: मार्च २०२०च्या तुलनेत जागतिक अर्थव्यवस्था स्थिर आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत खालच्या स्तरावरून तेलाच्या किंमतीतील सुधारणा या गोष्टीचा एक पुरावा आहे. मोटर वाहन वाहतूक उत्तर अमेरिकेत आणि बहुतांशी युरोपमध्ये महामारीच्या अगोदरच्या स्तरावर परतत आहे आणि कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी लावलेले लॉकडाउन व इतर प्रतिबंध शिथिल करण्यात येऊ लागल्याने हवेत विमानांची वर्दळ वाढली आहे.
शिवाय, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने आपल्या मासिक अहवालात सांगितले आहे की, ओपेक+ नावाने ओळखल्या जाणार्या पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांचे व सहयोगींच्या संघटनेला २०२२ अखेरपर्यंत महामारी पूर्व स्तरावर पोहोचण्यासाठी निर्धारित मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादनास प्रोत्साहन देणे आवश्यक असेल.
ओपेक या पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांच्या संघटनेने देखील हेल्दी मागणीचा आऊटलुक मजबूत केला आहे. ते आपल्या भाकितावर ठाम आहेत की, २०२१ मध्ये मागणी ५.९५ मिलियन बॅरल प्रति दिन वाढेल, जी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ६.६% जास्त आहे. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने असाही अंदाज वर्तवला आहे की, २०२१ मध्ये यूएस इंधनाच्या खपात १.४८ मिलियन बीपीडीने वृद्धी होईल, जी १.३९ मिलियन बीपीडी च्या मागील भाकितापेक्षाही जास्त आहे आणि या सर्व कारणांमुळे सध्याच्या आठवड्यांत तेलाच्या किंमतीत रॅलीला उत्तेजन मिळाले आहे.
महागाईची चिंता वाढत आहे: तेलाच्या किंमती वाढत आहेत, ज्यामुळे अमेरिकेत चलनवाढीविषयक चिंता वाढत आहेत. केंद्रीय बँकर मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी घालून जागतिक बाजारात विकासाला संतुलित करण्यासाठी पुढे आले आहेत आणि त्याचा प्रभाव अमेरिकेत वाढत्या चलनवाढीच्या रूपात स्पष्ट दिसत आहे.
चलनवाढ अर्थतंत्रात वृद्धीचा चांगला संकेत म्हटला जातो, पण हा संकेत अशा वेळी मिळत आहे, जेव्हा जागतिक विकास अजूनही महामारी प्रेरित अनिश्चिततेने ग्रासलेला आहे. यूएस कन्झ्युमर किंमती मे महिन्यात ५% (वार्षिक) ठोस वाढल्या, ज्यामुळे १३ वर्षांतील सर्वात मोठी आर्थिक वृद्धी झाली. कारण अर्थव्यवस्था पुन्हा सुरू केल्याने प्रवास-विषयक सेवांची मागणी वाढली.
तेलासाठी पुढे काय?: यूएसमधल्या वाढत्या चलनवाढीमुळे फेडने आधीच याबाबत चर्चेला तोंड फोडले आहे की, कसे आणि केव्हा मोठ्या प्रमाणात मालमत्ता-खरेदी कार्यक्रम आखडता घेण्यास सुरुवात करावी, ज्याने महामारीमध्ये यूएस अर्थव्यवस्थेला आधार दिला होता.
जेथे कामावरुन दूर करण्याचे प्रमाण कमी होत आहे, तेथे लेबर मार्केटकडून चलनवाढीला चालना मिळू शकते. नियोक्ता रोजी वाढवू लागले आहेत, कारण त्यांना कामगारांच्या उणिवेला तोंड द्यावे लागत आहे. लस आता व्यापक प्रमाणात उपलब्ध असली तरी लक्षावधी बेरोजगार अमेरिकन लहान मुलांची देखभाल, उदार बेरोजगारीचे लाभ आणि व्हायरसच्या भीतीने घरातच राहिले आहेत.
श्रम विभागाने सांगितले की, बेरोजगारी लाभासाठीचे प्रारंभिक दावे ६ जूनला समाप्त झालेल्या आठवड्यात ९००० ने कमी होऊन सीझनल दृष्टीने ३७६,००० पर्यंत कोसळले आहेत. कोव्हिड-१९ च्या साथीच्या पहिल्या लाटेने समग्र देशात लॉकडाउन होता, त्यावेळेस मार्च २०२० च्या मध्यानंतर हे आकडे सर्वात कमी आहेत. यामुळे त्यावेळी आवश्यक नसलेले सर्व व्यवसाय बंद झाले होते. सतत सहा आठवड्यांपासून दाव्यांची संख्या कमी होत आहे.
अमेरिकेतील प्रौढ वस्तीपैकी कमीत कमी अर्ध्या लोकांनी कोव्हिड-१९ विरुद्ध संपूर्ण लसीकरण करून घेतलेले आहे, आता ते प्रवास करू लागले आहेत. अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये वाढत्या लसीकरण मोहिमा या तेलाच्या मागणीतील तेजीचे एक मुख्य कारण आहे आणि रॉयटर्सच्या अलीकडच्या सर्वेक्षणानुसार २०२१ मध्ये तेलाची मागणी ५.५ मिलियन बॅरल प्रति दिन वाढून ६.५ एमबीपीडी होण्याची आशा आहे. हे एप्रिलमध्ये पहिल्या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीद्वारे तयार करण्यात आलेल्या सावधान आशावादी चित्रास अनुसरून होते, की उत्पादकांना अपेक्षित मागण्या पूर्ण करण्यासाठी २ दशलक्ष बीपीडी अधिक पंप करण्याची आवश्यकता भासू शकते.
हेज फंडाने तेलावर आपली पैज वाढवली: मनी मॅनेजर्स पहिल्या तिमाहीसाठी तेलावरची आपली पैज वाढवत आहेत, जे सोबत दिलेल्या आलेखात दिसून येत आहे. ११ मे २०२१ रोजी ३,८१,९४७ करारांच्या तुलनेत ८ जून रोजी नेट लॉन्ग ४,२४,४७६ करारांवर होते. हा स्पष्टपणे त्या कमोडिटीमधील जागतिक फंड मॅनेजर्सचा आशावाद दर्शवतो, जिला जागतिक अर्थव्यवस्थेतील एक बेंचमार्क मानले जाते.
जागतिक बाजारातील आशावाद तेलाच्या किंमतींना आणखी रेटा देऊ शकतो. आम्हाला आशा आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमती (सीएमपी: $७१/बीबीएल) एक महिन्याच्या दृष्टीने $७७/बीबीएलच्या दिशेने वाढतील, तर त्याच समय सीमेतएमसीएक्स ऑइल फ्यूचर्स (सीएमपी: ५२१४ रु./बीबीएल) ५६०० रु./बीबीएल मार्ककडे अग्रेसर होऊ शकते.