नवी दिल्ली – डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्याचे कोरोनाच्या दुस-या लाटेतच स्पष्ट झाले होते. लक्षणे दिसण्याच्या दोन दिवसांपूर्वीच इतर लोकांना लागण होत असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. डेल्टाचे ७४ टक्के लक्षणे दिसण्यापूर्वीच त्याचा फैलाव होत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. संशोधनाशी संबंधित हाँगकाँग विद्यापीठाचे अॅपिडेमोलाजिस्ट बेंजामिन काउलिंग सांगतात, असा संसर्ग रोखणे खूपच कठीण आहे. त्यामुळेच अनेक देशांमध्ये डेल्टाचा संसर्ग खूपच वेगाने होत आहे. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर इतर लोकांना संसर्ग होतो, असा दावा आतापर्यंत संशोधनात करण्यात आला होता. दुस-या संक्रमित व्यक्तिंना लक्षणे दिसली नाही, तर इतरांना संसर्गाचा धोका कमी असतो. परंतु या संशोधनात डेल्टा संबंधित दोन्ही गोष्टी फेटाळण्यात आल्या आहेत.
लक्षणे १.८ दिवसांआधीच
संशोधकांनी मे, जूनमध्ये १०१ लोकांची तपासणी केली. डेल्टा संसर्गग्रस्तांमध्ये लक्षणे विकसित होण्यासाठी सरासरी ५.८ दिवस लागतात. परंतु आताच्या संशोधनात असे आढळले आहे की, लक्षणे विकसित होण्यासाठी सरासरी १.८ दिवसांआधीच अशा बाधितांपासून इतर लोकांमध्ये फैलाव होत होता. या संशोधनाच्या आधारावरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ७४ टक्के संसर्गाची लागण लक्षणे दिसण्यापूर्वीच होत होती. एका संशोधनात असा दावा करण्यात आला होता की, लक्षणे विकसित होण्याच्या एका दिवसाआधीसुद्धा डेल्टाचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला होऊ शकतो. नव्या संशोधनात या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. हे महत्त्वाचे संशोधन आहे. याने डेल्टाचा प्रसार रोखण्यासाठीच्या रणनीतीत मदत होईल, असे सिंगापूर येथील नॅशनल सेंटर फॉर इंफेक्सियस डिसिसचे वर्नबे युवांग यांनी सांगितले.
लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग
नेचरमधील संशोधनाच्या दाव्यानुसार, लसीकरण झालेल्या लोकांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे. याबाबतचे वृत्त आधीही समोर आले होते. लस घेतल्याने किंवा न घेतल्याने डेल्टा संसर्ग होण्यापासून विशेष काही फरक पडत नाही. ७१९ लोकांवर झालेल्या अभ्यासानुसार, दोन्ही समुहात व्हायरल लोड एकसमान दिसून आला आहे. लस घेतलेल्या लोकांंची संसर्गातून लवकर मुक्तता होत आहे, हाच इतका एक फरक दिसत आहे.