इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या डिलिव्हरी बॉयवर महिलेला मानासिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत महिलेने सांगितले आहे की, डिलिव्हरी बॉय तिच्या घरी किराणा माल पोहोचवण्यासाठी आला. त्यानंतर त्याने मला व्हॉट्सअॅप मेसेज केला आणि लिहिले की, ‘मी तुला खूप मिस करतो आहे.’ एकमागून एक अनेक संदेश पाठवून त्याने त्रास दिल्याचे महिलेने सांगितले.
महिलेने सांगितले की, तिला एका रात्री SwiggyInstamart वरून किराणा सामनाची डिलिव्हरी मिळाली. त्यानंतर स्विगीचा डिलिव्हरी बॉय तिला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू लागला. पीडित महिलेने डिलिव्हरी बॉयसोबत झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला अहे. यात डिलिव्हरी बॉयने महिलेला हाय लिहून मेसेज केल्याचे दिसत आहे. याला उत्तर देताना तिने विचारले की, कोण? त्यावर उत्तर आले की, मला तुझी खूप आठवण येत आहे. शेवटी लिहिलंय की तुझं सौंदर्य, वागणूक, डोळे खुप चांगले आहेत. तसेच डिलिव्हरी बॉयकडून तिला त्रास देण्याची ही पहिली वेळ नाही, असे महिलेने सांगितले. महिलांनी डिलिव्हरी बॉयची तक्रार केली असल्याचेही सांगितले, मात्र ग्राहक सेवा संघाकडून महिलांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही.
delivery boy private messages to women customer