नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलीकडच्या दोन-तीन महिन्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, खून यासारखे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. अगदी मणिपूर पासून ते केरळपर्यंत आणि महाराष्ट्रातील पुणे, मुंबई सारख्या शहरापासून नवी दिल्ली पर्यंत या घटना सातत्याने समोर येत आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये दोन हत्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच एका तरुणाने लग्नास नकार मिळाल्याने रागाच्या भरात तरुणीची निर्घृण हत्या केली आहे. या दोन्ही घटनेमुळे दिल्लीतील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न कठीण बनला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी २४ तासांत महिलांची हत्या होत असताना महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
लोखंडी रॉडने वार
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये एखादी तरुणी माझी होत नाही तर कोणाचीच नाही, असा विचार करीत तिला थेट संपवून टाकतात, हे कृत्य पशुत्वाचे लक्षण म्हणता येईल. दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा २५ वर्षांच्या एका तरुणीची डोक्यामध्ये लोखंडी रॉडने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पलायन केले पण पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच त्याच्या मुसक्या आवळल्या, एकतर्फी प्रेम प्रकरणातून या तरुणीची हत्या करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान असून तो दिल्लीच्या संगम विहार परिसरात राहतो. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे आरोपीने हे भयानक कृत्य केले आहे.
कुटुंबियांचा विरोध
इरफानचे या तरुणीवर प्रेम होते, ती तरुणी त्याला फारसा प्रतिसाद देत नव्हती, परंतु त्याच्याशी बोलत होती, त्यालाच त्याने प्रेम समजले, तिने आपल्या शिल्लक न करावे असा त्याने तगादा लावला, ही गोष्ट त्या तरुणीच्या घरच्यांना समजली, तेव्हा त्यांनी त्याच्याशी बोलू नको आणि कोणत्याही संबंध ठेवू नको, असे सांगितले. याचाच इरफानला राग आला आणि रागाच्या भरात त्याने हे भयानक कृत्य केले. त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीचे प्रेम करणे किंवा लग्न इरफानसोबत लावून देण्यास विरोध दिला होता. त्यामुळे या तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. मयत तरुणीने कमला नेहरु कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. ही तरुणी आपल्या मित्रांसोबत गार्डनमध्ये आली होती. तेव्हा इरफानने तिच्या डोक्यावर रॉडने हल्ला करण्यात आला. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून गार्डन मधील सर्वजण घाबरून गेले, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले असून त्याच्यावर खटला दाखल करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे