इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून यात आपला मोठा धक्का बसला असून भाजपने मुसंडी मारली आहे. जवळपास २७ वर्षांनी भाजप दिल्लीत सत्तेत येणार आहे. पहिल्या सर्व कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांमध्ये भाजपने ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप २२ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन या निवडणुकीत दिसून आले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया या मोठया नेत्यांचा पराभव झाला आहे.
आपकी बार डबल इंजिन सरकार हा नारा आता भाजपचा प्रत्यक्षात उतरला आहे. गेल्या दोन निवडणुकीत आपने मोठे यश मिळवले होते. पण, या निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. केंद्रात असलेल्या सरकारला दिल्लीत आपले सरकार असावे असे वाटत असते. पण, ते प्रत्यक्षात भाजपच्या वाट्याला येत नव्हते. पण, यावेळेस दिल्लीकरांनी भाजपला साथ देत आपला धक्का दिला आहे.