इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिल्ली सरकारच्या त्यागराज स्टेडियममधील खेळाडू आणि प्रशिक्षकांनी दिल्लीच्या प्रधान सचिवांविरोधात तक्रार केली आहे. प्रधान सचिव संजीव खिरवार हे आपल्या कुत्र्याला फिरायला मैदानात घेऊन येतात. त्यामुळे तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना आपलं प्रशिक्षण वेळेपूर्वीच थांबवावं लागतं.
एका प्रशिक्षकाने सांगितले की, “आम्ही पूर्वी रात्री ८–८.३०पर्यंत सराव करायचो. पण आता आम्हाला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदान सोडण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून अधिकार्याला त्या मैदानावर त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरता येईल. आमचे प्रशिक्षण आणि सराव त्यामुळे विस्कळीत झाला आहे.”
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी खिरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. पण त्यांनी हे कबूल केले की ते अधूनमधून आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला त्या मैदानावर घेऊन जातात. परंतु त्यामुळे खेळाडूंना अडचण होते ही तक्रार त्यांनी फेटाळली आहे. इंडियन एक्स्प्रेसने गेल्या सात दिवसांत तीन संध्याकाळी स्टेडियमला भेट दिली. तेव्हा त्यांना स्टेडियमचे सुरक्षारक्षक संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ट्रॅकच्या दिशेने शिट्ट्या वाजवत येताना आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदान मोकळे करण्यास सांगताना दिसले.
स्टेडियमचे प्रशासक अजित चौधरी यांनी सांगितले की संध्याकाळची अधिकृत वेळ ४ ते ६ वाजेची आहे. परंतु सध्याच्या उन्हाच्या कडाक्याच्या परिस्थितीत ते खेळाडूंना ७ वाजेपर्यंत सराव करण्यास परवानगी देतात. मात्र याबाबत कोणताही अधिकृत आदेश नाही. संध्याकाळी ७ नंतर कोणताही सरकारी अधिकारी सुविधा वापरत असल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्हाला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदान बंद करावे लागते. हीच सरकारी कार्यालयीन वेळ आहे. हे मैदान दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील एक सरकारी कार्यालय आहे. येथे कोणताही अधिकारी आपल्या पाळीव कुत्र्याला चालण्यासाठी सुविधा वापरत आहेत याची मला काहीही माहिती नाही. मी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत स्टेडियम सोडतो आणि मला त्याची जाणीव नाही.“
तर इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टर्सनी मात्र सचिव खिरवार यांनी मैदानावर पाहिले. याविषयी विचारल्या खिरवार म्हणाले “मी कधीही खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितले नाही. मी गेलो तरी मैदान बंद झाल्यावर जातो. आम्ही आमच्या पाळीव प्राण्याला ट्रॅकवर सोडत नाही. आजूबाजूला कोणी नसतानाच आम्ही तिथे जातो.
https://twitter.com/abhinavsaha/status/1529672465345314816?s=20&t=hAZMImzO6MsXenfke4h71A