नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्लीचे न्यायालयही आता सुरक्षित राहिलेले नाही. आज, शुक्रवारी सकाळी साकेत न्यायालयात एक खळबळजनक घटना घडली आहे. साकेत कोर्टात सकाळी एका महिलेवर गोळी झाडण्यात आली. महिलेला साक्ष देण्यासाठी न्यायालयात आणण्यात आले होते.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1649324512285179904?s=20
ही घटना घडताच महिला पोलिसाने तातडीने या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. महिलेवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गोळी झाडणारी व्यक्ती वकीलाच्या वेशात आली होती.
एम राधा असे या महिलेचे नाव असून तिचे वय ४० आहे. जखमी महिलेला मॅक्स साकेत रुग्णालयात नेण्यात आले. प्रत्यक्षदर्शी रणजित सिंग दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४-५ राउंड गोळीबार करण्यात आला. आरोपी हा निलंबित वकील आहे, गोळी झाडल्यानंतर तो कॅन्टीनच्या मागील बाजूने पळून गेला. दरम्यान, गोळीबार करणारा हा त्या महिलेचा पती असल्याचे बोलले जात आहे.
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1649283045667799043?s=20
गेल्या वर्षी थेट हत्या
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला गँगस्टर जितेंद्र गोगी याची गर्दीने भरलेल्या रोहिणी कोर्टात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वकिलांच्या वेशातील दोन व्यक्ती न्यायालयात आले आणि त्यांनी गोगीवर गोळ्या झाडल्या. जितेंद्र गोगी याची टिल्लू टोळीच्या शूटर्सने हत्या केली होती. यावेळी पोलिसांनी झाडलेल्या गोळीत दोघे शूटर मारले गेले होते.
कुख्यात बदमाश जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी वकिलांच्या पेहरावात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल स्पेशल सेल पोलिसांनीही गोळ्या झाडल्या, ज्यात दोन्ही हल्लेखोर ठार झाले. अशाप्रकारे या घटनेत गुंड गोगीसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला होता.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने २०२० मध्ये जितेंद्रला अटक केली होती. काउंटर इंटेलिजन्स टीमने त्याला गुरुग्राम येथून अन्य तीन साथीदारांसह अटक केली होती. त्याच्या अटकेच्या वेळी दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
Delhi Saket Court Open Firing on Women