नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती भवन 1 डिसेंबर 2022 पासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या पाच स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी 10ते 11, 11 ते 12, दुपारी 12 ते 1, 2-३ आणि 3 ते 4 या वेळेत भेट देता येईल. राष्ट्रपती भवनला भेट देण्याव्यतिरिक्त, मंगळवार ते रविवार (राजपत्रित सुटी वगळता) आठवड्यातून सहा दिवस राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुलाला देखील लोकांना भेट देता येईल.
दर शनिवारी, लोकांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सकाळी 8 ते 9 या वेळेत चेंज ऑफ गार्ड सोहळा देखील पाहता येईल. राजपत्रित सुट्टी असल्यास किंवा राष्ट्रपती भवनाने तसे सूचित केले असल्यास शनिवारी हा सोहळा होणार नाही. http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour या संकेतस्थळावर अभ्यागत त्यांचे स्लॉट ऑनलाइन आरक्षित करू शकतात.
Delhi President House Open fo Citizens Announcement