नवी दिल्ली – राज्याचे भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग बोर्डचे सदस्य प्रदीप पेशकार यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रातील उद्योगांना असलेल्या विविध अडचणी बाबत चर्चा करुन निवेदन दिले. प्रामुख्याने बॅंकांच्या बाबतीतील समस्या, दुस-या लाटेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी वर उपाय म्हणून कर्ज खाते पुनर्बांधणी म्हणजे रीस्टक्चरींग करण्यासाठी विशेष धोरण ठरवावे तसेच डिजिटल एमएसएमई अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी चर्चा झाली. मार्केटिंग सपोर्ट योजनेत व्हर्चुअल प्रदर्शनाचा समावेश करावा अशी ही मागणी केली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई पार्क उभारण्यास अनूकूलता मंत्री राणे यांनी दाखवली. यावेळी राष्ट्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग बोर्डच्या माध्यमातून राज्यात योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी साठी विशेष बैठक घेण्याचेही मान्य केले.