नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीहून आज सकाळी नाशिककडे निघालेले स्पाईसजेटचे विमान अचानक पुन्हा दिल्लीला वळवावे लागले. ऑटो पायलटमधील बिघाडामुळे अर्ध्यावरच हे विमान परतावे लागले. विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने (DGCA) ने ही माहिती दिली आहे.
स्पाईसजेटच्या बोईंग ७३७ विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले आहे. DGCA अधिकाऱ्याने सांगितले की, स्पाईसजेट B737 विमान VT-SLP हे विमान दिल्लीहून नाशिकला निघाले होते. मात्र, काही वेळाकच पायलटला लक्षात आले की, विमान SG-8363 ला ऑटो पायलटमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे हे विमान माघारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही महिन्यांत इंधनाच्या चढ्या किमती आणि रुपयाची घसरण यामुळे आर्थिक गडबड, स्पाइसजेटच्या अनेक विमानांमध्ये त्रुटी आढळल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
https://twitter.com/PTI_News/status/1565199788961714177?s=20&t=XP3DMlE9K6bc2tNTrou35g
Delhi Nashik Spicejet Flight Scare Today
Air service Flight Autopilot Snag